थोरात, विखेंना मराठवाडय़ात फिरू देऊ नका-रावते Print

प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या औरंगाबादचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना बदला आणि कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनाही मराठवाडय़ात पाऊल ठेवू देऊ नका, असा आदेश शिवसेनेचे उपनेते दिवाकर रावते यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पाणीप्रश्नी आयोजित मोर्चात दिला. थोरात व विखे नगरमधून जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध करीत असून त्यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन करा, असे रावते म्हणाले.