राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ‘आरवायके’चे यश Print

प्रतिनिधी , नाशिक
नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत येथील एचपीटी व आरवायके विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण कामगिरी करीत यश मिळविले.
या स्पर्धेसाठी राज्यातील आठ विभागांतून एक हजार ५०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये २००, ४०० व ८०० मीटर फ्री स्टाईलमध्ये नमिता मादगुंडी (सुवर्ण), ५० व १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रुई सुखटणकर (रौप्य) व २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये (कांस्य), ४०० मीटर फ्री स्टाईलमध्ये यश कांबळे (कांस्य), याप्रमाणे पदक मिळविले.
 सांघिक फ्री स्टाईल व मिडेल रिले क्रीडा प्रकारात मुलींनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक मिळविले.
सांघिक रिले संघाचे नेतृत्व राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या नमिता मादगुंडी हिने केले.
रुई सुखठणकर, ऋ तुजा बान्ते आणि देवयानी गडाख या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली.