बोनस न दिल्यास उद्योजकांच्या घरासमोर ‘शिमगा’ Print

सिटूचा इशारा
प्रतिनिधी , नाशिक
शहरातील सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये कार्यरत हंगामी व प्रशिक्षणार्थी कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस द्यावा, अन्यथा कंपनी मालकांच्या घरांसमोर दिवाळीऐवजी शिमगा साजरा करण्यात येईल, असा इशारा सिटूतर्फे देण्यात आला आहे.
वर्षभरापासून संपावर असलेल्या एव्हरेस्टच्या कामगारांनाही दिवाळीपूर्वी बोनस देण्यात यावा, अशी मागणी सिटूतर्फे करण्यात आली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिंग इंजिनीअरिंग, सिंगक्वारी एक्युपमेन्टस् प्रा. लि., युनायटेड इंजिनीअरिंग, कॉपर सेमिस, जयनिक्स इंजि., प्रिमियम टुल्स प्रा. लि., क्लासिक फूडस्, तर अंबड औद्योगिक वसाहतीतील नाशिक फोर्ज प्रा. लि., गुरुदेव फोर्जिग, ओके टुल्स, शाम इलेक्ट्रामेक, संजय एन्टरप्रायजेस, सिन्नरमधील हिन्दुस्थान नॅशनल ग्लास, केल कॉर्पोरेशन लि., केटाफार्मा, रॅन्कोफार्मा, एफडीसी लि. या कंपन्यांतील कामगारांना दिवाळीचा बोनस मिळवून देण्यात सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियनचे डॉ. डी. एल. कराड, आर. एस. पांडे, सीताराम ठोंबरे, शांताराम घुगे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे, संतोष कुलकर्णी, संतोष काकडे, हरिभाऊ तांबे, अशोक लहाने, सतीश खैरनार, कल्पना शिंदे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.