भारती शिपयार्डमध्ये टाळेबंदीची घोषणा Print

खास प्रतिनिधी, रत्नागिरी
जहाजबांधणी क्षेत्रातील प्रसिध्द कंपनी भारती शिपयार्डने टाळेबंदी जाहीर केल्यामुळे कामगारक्षेत्रात खळबळ उडाली असून ठेकेदारी पध्दतीमुळे हा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. पस्तीस वर्षांपूर्वी मिऱ्या बंदर भागात स्थापन झालेल्या कंपनीत गेल्या महिन्यांपासून वातावरण चिघळू लागले. कंपनीतील सुमारे बाराशे तीस कामगारांपैकी १३० जण वगळता बाकी सर्वाची कंत्राटी पध्दतीने भरती  करण्यात आली आहे.
५५ ठेकेदारांमार्फत हे कामगार कंपनीमध्ये रुजू झाले आहेत. बहुसंख्य कामगारांना गेले किमान दोन ते सहा महिने वेतन मिळालेले नाही. मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी कामकाज स्थगित ठेवल्याचे  तसेच २२ नोव्हेंबरपासून कंपनी बंद करण्यात येणार असल्याचाही इशारा दिला आहे.