हॉटेल व्यावसायिकावर गोळीबार Print

प्रतिनीधी  ,मुंबई
हॉटेल व्यवसायिक बी आर शेट्टी यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. मुंबई उपनगरातील ओशिवरा येथे रात्री दहाच्या सुमारास आपल्या हॉटेलतून घरी जाताना ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी शेट्टी यांच्यावर तीन राऊंड फायर केल़े  गोळी त्यांच्या खांद्याला लागली असून त्यांना कोकीळाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेट्टी यांनी  कुणाच्याही विरोधात पोलिसात तक्रार केल्याची नोंदही नसल्याचे पोलिसांनी सांगितले.