रविवार मध्यरात्रीपासून टॅक्सींचा बेमुदत बंद Print

प्रतिनिधी , मुंबई
डॉ. हकीम समितीने शिफारस केल्याप्रमाणे टॅक्सीच्या भाडय़ात तीन रुपयांची वाढ मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी मुंबईतील ४५ हजार टॅक्सी रविवार मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जात आहेत. या संपामध्ये ठाणे आणि पुणे येथील टॅक्सीचालकही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते.