सोनसाखळी चोरांना अटक Print

प्रतिनिधी , ठाणे
तब्बल १० सोनसाखळी चोरीचे गुन्हे नावावर दाखल असलेल्या १६ वर्षीय मुलाला तसेच त्याच्या एका साथीदाराला ठाणे खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली .
कृष्णा रामजगा चौहान उर्फ बेटा (१९) आणि कासीम मुक्तार इराणी (१६), अशी अटक करण्यात आलेल्यांची  नावे असून हे दोघेही आंबिवली भागातील पाटीलनगरमध्ये राहतात. त्यांच्याकडून राबोडी पोलीस ठाण्यातील एक आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील दोन, असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.