खड्डय़ाने घेतला मुलाचा बळी Print

वार्ताहर , वाडा
भिवंडी-वाडा-मनोर या राज्य महामार्गावरील खड्डय़ामुळे एका विद्यार्थ्यांचा बळी गेला. खुपरी गावाजवळ बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता मोटार सायकल खड्डय़ात आदळल्याने मागे बसलेला महेंद्र रमेश माले (७) हा मुलगा बाहेर फेकला गेला. तेवढय़ात समोरून येणाऱ्या क्रेनच्या चाकाखाली सापडून तो ठार झाला. तो पहिलीत इयत्तेत शिकत होता.  या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची मुदत ऑक्टोबर अखेर संपत असून अद्याप निम्मे कामही झाले नाही.