नवरात्रोत्सवात तोरण मिरवणुकांना बंदी Print

प्रतिनिधी, पुणे
नवरात्रोत्सवात मागील वर्षी तोरण मिरवणुकीवरून धनकवडी व सांगवी भागात झालेले वाद व त्यातून पडलेल्या खुनांच्या पाश्र्वभूमीवर यंदा अशा मिरवणुकांना परवानगीच न देण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला आहे. पोलीस आयुक्त पोळ यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबची माहिती दिली. सहपोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल त्या वेळी उपस्थित होते.

नवरात्र महोत्सवात तोरणांची मिरवणूक काढण्याचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढले आहे. अनेक नवरात्रोत्सव मंडळांकडून तोरणांच्या मिरवणुका काढण्यात येतात. मात्र, या मिरवणुकांमध्ये किरकोळ भांडणांचे प्रकार होत असतात, मात्र मागील वर्षी या मिरवणुकांमध्ये दोन गटांमध्ये जोरदार वाद होण्याचे प्रकार झाले.मुख्य म्हणजे याच वादातून पुढे या भागात दोन टोळ्यांमधील तब्बल पाच लोकांचा हत्या झाली होती.