मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न Print

प्रतिनिधी, मुंबई
मंत्रालयाच्या गार्डन प्रवेशद्वारासमोर बुधवारी दुपारी एका इसमाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला वेळीच अटक करून हा प्रयत्न हाणून पाडला. बालमुकुंद जैस्वाल असे या व्यक्तीचे नाव असून तो चारकोप येथे राहणारा आहे. पैशांच्या वादातून झालेल्या भांडणातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सांगितले. बुधवारी रात्री उशिरा त्याला सोडून देण्यात आले.