‘आदर्श’ प्रकरणी दाखल तक्रारीवर कारवाई काय? Print

न्यायालयाची सीबीआयला विचारणा
प्रतिनिधी, मुंबई
‘आदर्श’ सोसायटीच्या ६६ सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत नोंदविलेल्या खासगी तक्रारीवर कोणती कारवाई केली, अशी विचारणा करीत त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले.
अब्दुल मलिक चौधरी यांनी जानेवारी २०११ मध्ये महानगरदंडाधिकाऱ्यांकडे खासगी तक्रार करून सोसायटीचे सदस्य असलेल्या ६६ सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या ६६ सदस्यांविरुद्ध फसवणूक, फौजदारी घुसखोरी, बनावट कागदपत्रे सादर करणे आणि कट रचणे आदी आरोपांअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी चौधरी यांनी तक्रारीत केली आहे.