जि.प. अध्यक्ष, पंचायत समिती सभापतींचे मानधन वाढणार Print

विशेष प्रतिनिधी
मुंबई
वाढत्या महागाईची झळ जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती  यांच्यासारख्या राजकीय नेत्यांना बसू नये, म्हणून त्यांच्या मानधनात राज्य शासनाने घसघशीत वाढ केली आहे. त्यांच्याबरोबरच उपाध्यक्ष, उपसभापती आणि विषय समित्यांचे सभापती यांचेही मानधन वाढणार आहे. राज्य शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
जि.प. अध्यक्षांचे मानधन दरमहा पाच हजार रुपयांवरून २० हजार रुपये तर उपाध्यक्षांचे मानधन चार हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्यात आले आहे. विषय समित्यांच्या सभापतींना चार हजार रुपयांऐवजी १२ हजार रुपये मानधन दिले जाईल. पंचायत समितीच्या सभापतींचे मानधन आता तीन हजार रुपयांवरून १० हजार रुपये करण्यात आले आहे, तर उपसभापतींना १५०० रुपयांऐवजी आठ हजार रुपये मानधन मिळणार आहे.