कोळसा खाणवाटप दडपण्याचे सरकारचे प्रयत्न-हंसराज अहीर Print

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केंद्रातील यूपीए सरकारने आधी कोळसा खाणींच्या वाटपात भ्रष्टाचार केला आणि आता या वाटपाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आंतरमंत्रालय समुहाच्या माध्यमातून धूळफेक करून हा घोटाळा दडपण्याचे प्रयत्न सरकारने चालविले असल्याचा आरोप कोळसा खाणवाटप घोटाळा उघडकीस आणणारे भााजपचे खासदार हंसराज अहीर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
ज्या बडय़ा कंपन्यांना भ्रष्ट मार्गाने कोळसा खाणींचे वाटप करण्यात आले, त्यांचे परवाने रद्द करण्याची कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांची िहमत नाही. कारण परवाने रद्द केले तर या कंपन्या खाणी मिळविण्यासाठी त्यांना दिलेले पैसे मागायला जयस्वाल यांच्या घरी पोहोचतील. त्यामुळे कोळसा खाणींच्या वाटपाचे प्रकरण आंतरमंत्रालय समुहाकडे सोपवून निव्वळ धूळफेक करण्यात येत आहे. या समुहाने ज्या कंपन्यांच्या कोळसा खाणींचे परवाने रद्द केले, त्या छोटय़ा कंपन्या आहेत. त्यांना बहाल करण्यात आलेल्या कोळसा खाणींची क्षमताही फारशी नाही. पण मोठय़ा कंपन्यांना देण्यात आलेल्या मोठय़ा कोळसा खाणींचे परवाने रद्द करण्याची िहमत सरकारला दाखवता आलेली नाही, अशी टीका हंसराज अहीर यांनी केली.