‘यशवंतरावांचे कुशल नेतृत्व आजच्या तरुण पिढीली प्रेरणादायी’ Print

ठाणे
 यशवंतराव चव्हाण यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे कुशल नेतृत्व आजच्या तरुणापर्यंत घेऊन गेले पाहिजे, तसेच आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर समाजातील विधायक कामे करण्यात ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) कोकण विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी पालघर येथे केले.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभागाचे सदस्य प्रल्हाद ऊर्फ बाबा कदम यांनी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने तालुक्यातील विविध क्षेत्रांत भरीव कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा दादोबा ठाकूर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ लिमये बोलत होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चंद्रकांत पाटील, डॉ. सुभाष पाटकर, प्रभाकर पाटील, प्रतिभा कामत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण यांचे विचार व कर्तृत्व पालघर तालुक्यात तळागाळात पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रतिष्ठानचे सदस्य बाबा कदम करीत असून, आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरत असल्याचे मत राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी मांडले. परंतु आदिवासी भागातील ज्येष्ठांची चिंताजनक परिस्थिती पाहून दु:ख वाटते. येथील ज्येष्ठ नागरिक संघाने या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे आवाहन केले.
ज्येष्ठ नागरिक संघात विविध क्षेत्रांत, खात्यांत, उल्लेखनीय कार्य केलेले मान्यवर असल्याने त्यांच्याजवळ असलेल्या अनुभवाची शिदोरी सेवानिवृत्तीनंतरच्या वाटचालीत इतरांना मार्गदर्शक ठरले. साक्षरता, अंधश्रद्धा, निर्मूलन, ग्रामस्वच्छता, अस्पृश्यता निवारण, सामाजिक, सलोखा, राष्ट्राभिमान जागृत ठेवणे, तसेच नि:स्वार्थी कार्य करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, तसेच सेवानिवृत्ती हा आपल्या सेवेचा अर्धविराम आहे. असे समजून कार्य करण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक डॅनियल, धीवर यांनी केले. या वेळी बळवंत दळवी, प्रतिभा कदम, भगवान पाभाळे, प्रतिभा कदम, मोरेश्वर घरत, नवनीस भाई शहा, शिवराम तिवारी, नाढले, अनंत राऊत, दामोदर पाटील, पो. नि. श्रीकांत पिंगळे इत्यादी मान्यवरांचा सत्कार राज्यमंत्री राजेंद्र गावित व कोकण विभागाचे अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्या हस्ते करण्यात आला.