दोन टाकी गोळीबारप्रकरणी एकाला अटक Print

प्रतिनिधी , मुंबई
जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन टाकी परिसरात व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न करून एकावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. जनी उर्फ नझीर खान (३६) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने अद्याप गुन्ह्याची क बुली दिलेली नसली तरी, तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती ज़े ज़े पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत सुर्वे यांनी दिली.
गेल्या आठवडय़ात कोकणातून मुंबईत खरेदीसाठी आलेले व्यापारी पुंडलिक सावंत यांना दोन टाकी परिसरात अडवून त्यांच्याकडील बॅग हिसकावून एक त्रिकुट फरार झाले होते. त्यापैकी पळून जाणाऱ्या एकाला पकडण्याचा स्थानिक रहिवाशी मयेकर यांनी प्रयत्न केला होता. तेव्हा उर्वरित दोघांनी मयेकर यांच्यावर गोळीबार करीत आपल्या साथीदाराची सुटका केली होती.