सोनसाखळी चोरणाऱ्यास अटक Print

प्रतिनिधी , मुंबई
alt

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळणारा कुख्यात आरोपी जुल्फिकार अहमद हुसेन सय्यद (३४) याला सहार पोलिसांनी अटक केली. कार्यालयातून घरी निघालेल्या चित्रा जाधव (२४) या बस पकडण्यासाठी रात्री नऊच्या सुमारास मित्तल इंडस्ट्रीयल बस स्थानकात थांबल्या होत्या. बस क्रमांक ३३२ मध्ये चढत असताना जुल्फिकार सय्यदने त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे साध्या वेषात तैनात असलेल्या पोलिसांनी सय्यदला अटक केली.