जकात नाक्यावरूनही घुसू शकतात अतिरेकी ! Print

प्रतिनिधी, मुंबई
जकात चोरी वाढीस लागली असून ती अशीच सुरू राहिली तर अतिरेकी याच जकात नाक्यावरून शस्त्र आणू शकतील, असा इशारा मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिला आहे. ‘मिशन मृत्युंजय’ या कार्यक्रमानिमित्त दक्षिण मुंबईतील प्राध्यापक आणि प्राचार्याना मार्गदर्शन करताना त्यांनी हा इशारा दिला आहे.
माणसांमध्ये प्रामाणिकपणा कमी होऊ लागला आहे. जकात नाकी ही संवेदनशील असतात. त्यातून सामान आणतांना कमी जकात लागावी म्हणून पैसे देऊन कमी मालाच्या खोट्या पावत्या बनविल्या जातात. त्यामुळे या सामानांची तपासणी केली जात नाही. असाच प्रकार सुरू राहिला तर कदाचित अतिरेकी त्याचा गैरफायदा घेऊन शस्त्रही त्या मार्गाने आणू शकतील, असा इशारा सिंग यांनी दिला आहे.