२८ लाखांचे अंमली पदार्थ जप्त Print

प्रतिनिधी, मुंबई
अंमली पदार्थ विरोधी शाखेने गुरूवारी मुंबईत तीन ठिकाणी घातलेल्या धाडीत सुमारे २८ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या तिन्ही प्रकरणात एकुण चार जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका भारतीयासह दोन नायजेरीयन आणि एका आयवरीन कोस्टा देशातील नागरिकाचा समावेश आहे.
  अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने वाडीबंदर येथून ९ लाख रुपयांचे दिडशे ग्रॅम कोकेन जप्त करुन एका नायजेरीयन नागरिकाला अटक केली. कांदिवली युनिटने मालवणी येथून सव्वा लाख रुपये किंमतीचे चरस जप्त करुन एका भारतीय नागरिकाला अटक केली आहे. तर वांद्रे युनिटने बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळून दोन परदेशी नागरिकांना अटक करुन त्यांच्याकडून १८ लाख रुपये किंमतीचे कोकेन जप्त केले आहे