मुंबई पोलिस सलमान खानच्या पाठिशी - वाय. पी. सिंग Print

alt

मुंबई, २ नोव्हेंबर २०१२
गेली दहा वर्षे मुंबई पोलिस अभिनेता सलमान खान याला 'हीट अ‍ॅण्‍ड रन' प्रकरणी पाठिशी घातल असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी आज (शुक्रवार) मुंबईत केला. सलमान खानवर गेल्या दहा वर्षापासून मुंबईतील फूटपाथवर झोपलेल्या पाच निरपराध लोकांवर गाडी घालून ठार मारल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याप्रकरणी सलमान खानला ज्या वेळेस अटक झाली आहे तेव्हा ताबडतोब जामीन मंजूर केला जातो, असं वाय. पी. सिंग पत्रकारांशी बोलताना म्हणाले. सदर गुन्ह्याशी संबंधित साक्षीदारास मुद्दामहून उशीरा बोलवण्यात येते व या प्रकरणाची फाईल लांबणीवर टाकली जाते, असा आरोपही सिंग यांनी मुंबई पोलिसांवर केला आहे.
आजवर सलमान खानला न्यायलायाने शंभर वेळा साक्षीसाठी बोलावले आहे. त्यापैकी ८२ वेळा तो गैरहजर राहिला आहे. असं असताना त्याच्यावर एवढी मेहेरबानी का दाखवली जाते, असा सवाल सिंग यांनी उपस्थित केला आहे.