‘त्या’ मुलीचा मृत्यू गुदमरून Print

प्रतिनिधी
ठाणे
ठाणे-कळवा रेल्वे स्थानकादरम्यान खाडीमध्ये बॅगेत आढळलेल्या ‘त्या’ मुलीचा मृत्यू चौवीस तासांपूर्वी गुदमरून झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणेनगर पोलिसांनी या अहवालाच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे-कळवा रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या खाडीमध्ये एका बॅगेत दीड ते दोन वर्षीय मुलीचा मृतदेह गुरुवारी पोलिसांना आढळला होता. तिच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याने मृत्यूचे कारण समजू शकलेले नव्हते. दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तिचे शवविच्छेदन करण्यात आले होते.
शुक्रवारी या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल मिळाला असून त्यामध्ये चोवीस तासांपूर्वी गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांनी दिली. तसेच तिची अद्याप ओळख पटलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.