संपत्ती जाहीर न करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचा पगार रखडणार! Print

प्रतिनिधी
मुंबई
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता जाहीर न केल्यास त्यांचा नोव्हेंबरचा पगार रोखण्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे. अधिकाऱ्यांना ऑक्टोबपर्यंत मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण बहुतेक अधिकाऱ्यांनी आपल्या संपत्तीची माहिती संबधित विभागाकडे न दिल्याने नोहेंबरच्या पगारापासून बऱ्याच अधिकाऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे.
अधिकाऱ्यांनी नियमानुसार १५ जूनपर्यंत आपल्या मालमत्तेची माहिती सादर करणे अपेक्षित होते. मात्र अधिकाऱ्यांनी ही माहिती वेळेत सादर केली नाही. अद्याप माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांना आता पगार न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढील वर्षांपासून मालमत्ता लपवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्ष्यी प्रभावाने जुलै महिन्यापासूनच कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.