भातखंडे परिवार स्नेहसंमेलन उज्जनमध्ये Print

प्रतिनिधी
मुंबई
महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेल्या वसिष्ठ गोत्री चित्तपावन भातखंडे परिवाराचे सातवे वार्षिक स्नेहसंमेलन राज्याबाहेर करण्याचे ठरले आहे. हे संमेलन ८ जून २०१३ या दिवशी मध्य प्रदेशातील उज्जन येथे होणार आहे. भातखंडे परिवारातील सर्व सदस्यांनी तसेच माहेरवाशिणींनी या संमेलनास मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. इच्छुक सदस्यांनी आपल्या उपस्थितीबाबतचा तपशील एक डिसेंबरपूर्वी आयोजकांकडे पाठवणे आवश्यक आहे. संपर्क- वासुदेव भातखंडे, पनवेल (९८६९८४६४८५), रविकांत भातखंडे, डोंबिवली (९७०२१८४५०३).