दक्षिण मुंबईत दीड तास वीज गायब Print

प्रतिनिधी
मुंबई
‘बेस्ट’चा वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर बिघडल्याने दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक भागात सुमारे दीड तास वीजपुरवठा खंडित झाला.
मुंबई शहरात ‘बेस्ट’तर्फे वीजपुरवठा केला जातो. शनिवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हुतात्मा चौक भागात वीजपुरवठा करणारा ‘बेस्ट’चा ट्रान्सफॉर्मर बिघडला आणि वीजपुरवठा खंडित झाला.
याची माहिती मिळताच ‘बेस्ट’चे अधिकारी-कर्मचारी तिकडे गेले आणि त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. सुमारे तासाभराने तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला आणि वीजपुरवठा सुरळीत झाला.