दिवाळीनिमित्त एसटीच्या जादा बसगाडय़ा Print

पुण्यातून सर्वाधिक बसेस सुटणार
प्रतिनिधी
मुंबई
दिवाळी निमित्त महाराष्ट्रातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २५ नोव्हेंबपर्यंत राज्यभरातील पाच विभागातून जादा बसेस सोडण्याचे जाहीर केले आहे. तब्बल ९७९० बसेस या काळात सोडण्यात येणार असून सर्वात जास्त बसेस पुणे विभागातून सोडण्यात येणार असल्याचे महामंडळाने पत्रकात म्हटले आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागातून १४८०, अमरावती विभागातून ६२०, नागपूर विभागातून ७००, मुंबई विभागातून १६६०, नाशिक विभागातून १३२० तर पुणे विभागातून २०८० अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. या सर्व बसेसचे आरक्षण एसटीच्या संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर उपलब्ध आहे. पुण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने ८ ते १३ नोव्हेंबर या काळात २०८० अतिरिक्त बसेसपैकी १९३० बसेस पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मैदान (संचेती चौक), शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड (वल्लभनगर) आणि पुणे रेल्वे स्थानक येथून सोडण्यात येणार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.