सह्याद्री वाहिनीवरील ‘साहित्याची साठवण’मध्ये रामदास भटकळ व मंगेश पाडगावकर! Print

प्रतिनिधी

मुंबई
‘पॉप्युलर प्रकाशन’च्या हीरक महोत्सवानिमित्त ‘नवसाहित्याची साठवण’ हा विशेष भाग सह्याद्री वाहिनीवरील ‘अमृतवेल’ या कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहेत. येत्या ५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता हा भाग प्रसारित होणार आहे. मराठी प्रकाशनविश्वात ‘पॉप्युलर’ हे अग्रणी नाव आहे. नवसाहित्याच्या पर्वाचा इतिहास पॉप्युलरचे सर्वेसर्वा रामदास भटकळ आणि कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या साक्षीने ‘अमृतवेल’ या कार्यक्रमात उलगडणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविराज गंधे यांनी केले असून याचे पुनप्रसारण रविवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०१२ रोजी ‘सह्याद्री’ वाहिनीवरून सकाळी सात वाजता होणार आहे.