गुरुवारी वांद्रय़ातील काही भागात पाणी नाही Print

प्रतिनिधी
मुंबई
वांद्रे (प.) येथील हार्बर रेल्वे रुळालगत, पश्चिम द्रुतगती महामार्गावर माहीम कॉजवे पुलाखालून जाणाऱ्या ७५० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी ८ नोव्हेंबरला  वांद्रय़ातील काही विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या जलवाहिनीतून होत असलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पूर्ण होईल, असा अंदाज पालिकेच्या जलविभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ८ नोव्हेंबर रोजी वांद्रे रेक्लेमेशन, बाजार रस्ता, वांद्रे रेल्वे स्थानक रस्ता, ओएनजीसी वसाहत, लिलावती रुग्णालय, एस. व्ही. मार्ग, हिल मार्गा, वांद्रे (प.) येथील टर्नर मार्ग येथील पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. नागरिकांनी ७ नोव्हेंबरला पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.