नवजात बालिका सापडली Print

प्रतिनिधी
मुंबई
रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मालाड पूर्व येथील दिंडोशी सत्र न्यायालयाच्या मागील गल्लीत ७-८ दिवसांची बालिका सापडली.
या बालिकेला भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. अज्ञात व्यक्तीने अवघ्या सात-आठ दिवसांच्या नवजात बालिकेला रस्त्यावर उघडय़ावर टाकून दिले असून यासंदर्भात ज्ञानदेव आव्हाड यांनी पोलिसात तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.