कांदिवली येथे सुरक्षारक्षकाची हत्या Print

प्रतिनिधी
मुंबई
कांदिवली येथील क्रांतीनगरमध्ये राहणाऱ्या उदय सिंग (३०) या सुरक्षा रक्षकाची रविवारी दुपारी हत्या करण्यात आली. उदय सिंग याच्याच दोन सहकाऱ्यांनी त्याची हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. क्रांतीनगरमधील पांडे चाळीत उदय सिंग हा आपल्या दोन सहकाऱ्यांसह राहत होता. दुपारी त्यांच्या घरातून मारामारीचा आवाज शेजारी राहणाऱ्या महिलेला आला. तिने चाळमालक पांडे याला जाऊन हा प्रकार सांगितला. तो येईपर्यत घराला कुलूप लावलेले आढळले. मग पोलिसांना बोलावून दार उघडण्यात आले तेव्हा उदय सिंग जखमी अवस्थेत आढळला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. त्याच्या मानेवर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने जखमा झाल्याचे आढळून आले.