मालाडमध्ये वृध्द महिलेची हत्या Print

मुंबई, ५ नोव्हेंबर २०१२
मुंबईतील मालाड पश्चिम भागात रविवारी रात्री निर्मला व्होरा या ७८ वर्षीय वृध्द महिलेची हत्या करण्यात आली. व्होरा यांची मुलगी आणि जावई रात्री घरात नसताना ही घटना घडली. व्होरा यांच्या घरातून दहा तोळे सोने आणि ३५ हजार रुपयांची रोकडही चोरीस गेली आहे. या हत्येबाबत पोलिसांकडून चौकशीस आणि तपास सुरू आहे.     

 

निर्मला व्होरा यांची हत्या चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी बलराम जयस्वाल या व्यक्तीला अटकही करण्यात आली असून घटनास्थळाहून एक चाकू जप्त करण्यात आला आहे.