वांद्रे येथे जर्मन महिलेवर बलात्कार Print

मुंबई, ५ नोव्हेंबर २०१२
वांद्रे परिसरातील पेरी क्रॉस रोडवर राहणा-या २७ वर्षीय जर्मन महिलेवर बलात्काराची घटना आज (सोमवार) पहाटे घडली. ही महिला जर्मन नागरिक असून वांद्रे येथील पेरी क्रॉस रोडवर एका तीन मजली इमारतीत भाड्याने राहत आहे. एक अज्ञात इसम घराच्या खिडकीतून आत आला आणि त्याने चाकू दाखवून मौल्यवान वस्तूंची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेने काही डॉलर्स, भारतीय रूपये आणि कॅमेरा चोराच्या हवाली केला. त्यानंतर त्या अज्ञान इसमाने आपल्यावर बलात्कार केल्याचे महिलेने वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आज पहाटे ३.३० ते ४.३० च्या दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी प्रथम दर्शनी अहवाल नोदंवून घेतला असून त्याआधी महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालायात नेण्यात आले. पोलिसांनी चोराच्या हाताचे ठसे घेतले असून आरोपीचा शोध चालू आहे.