अंधेरी, चर्नीरोडवरील नवे पादचारी पूल सुरू Print

प्रतिनिधी, मुंबई
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि चर्नीरोड स्थानकाच्या उत्तरेकडील बाजूस दोन नवे पादचारी पूल सुरू करण्यात आले असून रेल्वे वाहतुकीस कोणताही अडथळा न होता या पुलांची उभारणी करण्यात आली आहे.
चर्नीरोड येथे पाच मीटर रुंदीचा पादचारी पूल उभारण्यात आला असून त्यामुळे चौपाटीकडे जाणाऱ्या नागरिकांची सोय झाली आहे. अंधेरी येथील पादचारी पूल जीर्ण अवस्थेत होता आणि त्याची दुरुस्ती शक्य नसल्याने रेल्वे प्रशासनाने नवा पूल उभारण्याचा निर्णय घेतला. या पुलाच्या उभारणीतही वाहतुकीला कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. अंधेरी आणि जोगेश्वरीच्या दरम्यान उभारण्यात आलेल्या या पुलाची लांबी २९ मीटर असून रुंदी तीन मीटर आहे. पश्चिम रेल्वेने पाच वर्षांंमध्ये १९ नवे पादचारी पूल उभारले असून आठ भुयारी मार्ग बांधले आहेत.