‘फिगो’च्या अध्यक्षपदी डॉ. पुरंदरे यांची निवड Print

प्रतिनिधी, मुंबई

स्त्रीरोगविज्ञान आणि प्रसुतीशास्त्र या विषयातील तज्ज्ञांच्या ‘फेडरेशन ऑफ गायनॉकॉलॉजी अँड ऑबस्ट्रेटिक्स’ (फिगो) या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. सी. एन. पुरंदरे यांची निवड झाली आहे. इटलीत सुरू असलेल्या फेडरेशनच्या २०व्या आंतरराष्ट्रीय संमेलनात त्यांची निवड झाली आहे. डॉ. पुरंदरे हे संस्थेच्या नियमाप्रमाणे २०१५ मध्ये पदभार स्वीकारणार आहेत.

विद्यमान अध्यक्ष सर सबराथनम अरुलकुमारन यांनी रोममध्ये होणाऱ्या या संमेलनात तीन वर्षांसाठी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली असून त्यांच्यानंतर डॉ. पुरंदरे हे अध्यक्षपद भूषवतील.