कसाब डेंग्यू आजारातून मुक्त
|
|
मुंबई, ६ नोव्हेंबर २०१२ पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब गेल्या एक आठवड्यापासून तापाने आजारी होता. परंतू आता त्याची प्रकृती ठीक असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी विनोद लोखंडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
कसाब १ नोव्हेंबर पासून आजारी होता आणि जे.जे इस्पितळाच्या डाँक्टरांनी कसाबची तपासणी केली असता त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. पण आता कसाब डेंग्यू आजारातून पूर्णपणे बरा झाला असल्याचे लोखंडे यांनी स्पष्ट केले आहे. |