हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश बंदी Print

alt

मुंबई, ६ नोव्हेंबर २०१२
मुंबईतील हाजीअली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. हाजीअली दर्ग्याला दररोज हजारो नागरिक भेट देत असतात, परंतू दर्ग्याच्या विश्वस्तांनी दर्ग्यात महिलांच्या प्रवेशाला बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय अंतिम असल्याचेही स्पष्ट केले आहे.

तसेच 'दर्ग्याच्या बाहेरील जागेत महिलांना प्रवेश आहे, पण दर्ग्याच्या आत येण्यास बंदी घालण्यात आली आहे', असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. पंधराव्या शतकातील सुफी संत पीर हाजीअली शाह बखरी यांचा हा दर्गा आहे. मुंबईच्या दक्षिण वरळी परिसरात अरबी समुद्राच्या किना-यावर हा दर्गा आहे. तसेच आत्तापर्यंत अनेक चित्रपटांसाठी देखील या दर्ग्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.