कल्याण साळवे मृत्यूचा तपास गुन्हे शाखेकडे Print

प्रतिनिधी
मुंबई
विद्याविहार येथे रविवारी रात्री पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या कल्याण साळवे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या टिळकनगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल तडवी आणि लाड यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कल्याण साळवे याच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.