कल्याणमध्ये बालिकेचे अपहरण Print

प्रतिनिधी
कल्याण
कल्याण रेल्वे स्थानकालगतच्या एस.टी. बस स्थानकातून रविवारी रात्री झोपेत असलेल्या श्रद्धा या अकरा महिन्यांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले आहे.  आशा प्रवीण भुवंडे (वय २८) ही पती, तीन मुली व एक मुलगा यांच्यासह आगारात भिवंडीला जाणाऱ्या फलाटावर झोपली होती. हे कुटुंब मोलमजुरी करते. रविवारी रात्री अकरा ते सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान भुवंडे कुटुंब झोपेत होते.
पहाटे आशाला श्रद्धा या मुलीचे अपहरण झाल्याचे लक्षात आले. शोध घेऊनही ती न सापडल्याने या दाम्पत्याने फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अपहृताचा पोलीस शोध घेत आहेत.