मीरा-भाईंदर कर्मचाऱ्यांचा बोनसचा मार्ग मोकळा Print

वसई /प्रतिनिधी-
मीरा-भाईंदर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत उद्या बुधवारी महापौर कॅटलीन परेरा यांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची बैठक होणार आहे. कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ७८०० बोनस मिळण्याची शक्यता आहे. गेली तीन वर्षे १५०० पालिका कर्मचाऱ्यांना पाच हजार आठशे ३० रुपये प्रत्येकी सानुग्रह अनुदान दिले गेले. यंदा अर्थसंकल्पात बोनससाठी एक कोटी ३५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना ७८०० रुपये तर आरसीएचमधील संगणक चालकांनाही साडेचार ते पाच हजार बोनस मिळण्याची शक्यता आहे.