कल्याण पालिका कर्मचाऱ्यांना दहा हजार बोनस Print

प्रतिनिधी
कल्याण
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी दहा हजार एक रुपया दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला. पालिकेतील ६ हजार ४०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ९ नोव्हेंबरला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल . बोनसमुळे पालिकेच्या तिजोरीवर ६ कोटी ४० लाखांचा बोजा पडेल. पालिकेतील ५ हजार ४५०, परिवहन विभागातील ३५०, शिक्षण मंडळातील ६०० कर्मचाऱ्यांना या सानुग्रह अनुदानासह मिळणाऱ्या बोनसचा लाभ मिळणार आहे. पालिका प्रशासनाने साडेनऊ हजार बोनस देण्याची तयारी दर्शविली होती, परंतु पालिका पदाधिकाऱ्यांनी या रकमेत ५०० रुपये वाढवून बोनस जाहीर केला.