केशर तस्करीप्रकरणी इराण्याला अटक Print

प्रतिनिधी
मुंबई
सुमारे साडेपाच लाख रुपयांचे केशर तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इराणच्या नागरिकास सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले.
कलांतरझादेह तेझेरजानी सय्यद अहमद असे त्याचे नाव आहे. त्याच्याजवळील सामानात आठ किलो केशर सापडले. केशराची तस्करी करण्याचा प्रयत्न केला जाणार होता अशी कबुली अहमद याने दिली आहे.