आझाद मैदान हिंसाचार : १४ आरोपींना जामीन Print

प्रतिनिधी
मुंबई
आझाद मैदानात ११ ऑगस्ट रोजी उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेल्या आणखी १४ जणांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणात १४ जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला असल्याने जामिनावर सुटलेल्यांची संख्या आता २८ झाली आहे.
पुराव्याअभावी ५ जणांना दोषमुक्त करण्यात आले आहे.