प्रा. श्रीराम अभ्यंकर यांची शोकसभा Print

प्रतिनिधी, मुंबई
बीजगणितीय भूमितीत जागतिक स्तरावर ठसा उमटवणारी कामगिरी करणारे ज्येष्ठ गणितज्ज्ञ प्रा. श्रीराम अभ्यंकर यांची शोकसभा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.
 अभ्यंकर यांनी स्थापन केलेल्या लॉ कॉलेज रोडवरील ‘भास्कराचार्य प्रतिष्ठान’मध्येच ही शोकसभा गुरुवार, ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. जागतिक स्तरावर गणित या विषयात कीर्ती मिळवणाऱ्या प्रा. श्रीराम अभ्यंकर यांचे २ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच ते या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षही होते. गणितातील त्यांचे योगदान, भास्कराचार्य प्रतिष्ठानसाठीची त्यांची मेहनत आणि गणिताच्या प्रसारासाठी त्यांची तळमळ या सर्वाची आठवण म्हणून पुण्यात ही शोकसभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेसाठी विद्यार्थी, प्रा. अभ्यंकर यांचे स्नेही आणि चाहते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भास्कराचार्य प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.