‘त्या‘ गैरहजर नगरसेवकांच्या घरी पोलीस बंदोबस्त Print

अंबरनाथ पालिका निवडणूक
प्रतिनिधी
ठाणे
अंबरनाथच्या नगराध्यक्षपदासाठी सोमवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीच्या वेळी गैरहजर राहणाऱ्या आघाडीच्या ‘त्या' चार नगरसेवकांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक नासीर कुंजाली, रिपाइंचे मनोज देवडे, रविंद्र करंजुले आणि रजनी तांबे या निवडणुकीच्या वेळी गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात काही अज्ञातांनी ‘गद्दार नगरसेवक' अशा आशयाचे फलक लावले होते. काहीजणांनी ते फलक काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन गटात वादावादी झाली. पोलिसांनी त्वरीत हस्तक्षेप करून फलक ताब्यात घेतले. त्यानंतर चारही नगरसेवकांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात
आला आहे.