भारनियमनमुक्तीसाठी वीजखरेदी Print

प्रतिनिधी
मुंबई
डिसेंबर २०१२ मध्ये राज्यभर संपूर्ण भारनियमनमुक्ती साजरी करण्यासाठी वीज कमी पडत असल्याने ‘महावितरण’ने पुन्हा एकदा बाजारपेठेकडे मोर्चा वळवला असून ३०० मेगावॉट अल्पकालीन वीजखरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. वीजचोरी जादा असलेल्या भागांतही भारनियमनमुक्तीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यासाठी जादा वीज मिळवण्यासाठी ही धडपड आहे.
डिसेंबर २०१२ मध्ये राज्य भारनियमनमुक्त करण्याचे राज्य सरकारचे आश्वासन आहे. या वर्षीच्या उन्हाळय़ात जादा वीजचोरी असलेल्या ड, ई, फ या गटांत मोडणाऱ्या भागात भारनियमनमुक्ती करायची नाही, असे ठरवण्यात आले होते. पण दोन महिन्यांपूर्वी हे धोरण बदलण्यात आले. त्यामुळे सुमारे एक हजार मेगावॉट जादा विजेची तरतूद करण्याची वेळ ‘महावितरण’वर आली. शिवाय रब्बीसाठीही मोठय़ाप्रमाणात कृषीपंपांचा वापर होणार असल्याने १९ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीसाठी सकाळी सहा ते सायंकाळी पाच या वेळेत ३०० मेगावॉट वीज घेण्यात
येत आहे.