बिल्डरकडे खंडणी मागणारा शिवसैनिक अटकेत Print

प्रतिनिधी
कल्याण
कल्याण पश्चिमेतील आनंद दुबे या बांधकाम व्यावसायिकाकडे पाच कोटींची खंडणी मागण्याचा आरोप असलेले मोहने विभागाचे शिवसेनेचे उपविभागप्रमुख अंकुश जोगदंड यांना दोन दिवसांच्या चौकशीनंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सांगितले, जोगदंड हे दुबे या बांधकाम व्यावसायिकाकडे पाच कोटींची खंडणी मागत होता. याबाबत दुबे यांनी ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती. जोगदंड यांना पोलिसांनी रविवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी मोहने येथील बाजारपेठ शिवसैनिकांनी निषेध म्हणून बंद केली. पोलिसांनी या बंदची दखल न घेता जोगदंड यांची चौकशी सुरूच ठेवली होती. दोन दिवसांच्या चौकशीनंतर अखेर आज जोगदंड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला.  या प्रकरणातील त्यांचा फरारी साथीदार शौकत शेख याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील तपास करीत आहेत.