हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांचीच चर्चा होणार Print

खास प्रतिनिधी, मुंबई
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ ते २१ डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार आहे. दोन आठवडे चालणाऱ्या या अधिवेनशनात प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक विधेयकासह ११ विधेयके मांडण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
 या अधिवेशनात एकूण ११ दिवस कामकाज होणार आहे. पहिल्या आठवडय़ात विरोधी पक्षाचा प्रस्ताव तर दुसऱ्या आठवडय़ात पुरवणी मागण्या आणि विनियोजन विधेयक आणि सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावर चर्चा होणार असून याच आठवडय़ात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे.