मनसे करणार नऊ रुपये किलोने साखरवाटप! Print

विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी नऊ रुपये किलो दराने साखरवाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, राम कदम यांनी मुंबईतील आपापल्या मतदारसंघात स्वस्त दरात साखर वाटपासह विविध उपक्रम हाती घेतले आहेत. नाशिक येथील मनसेच्या आमदारांनीही स्वस्तात साखर व फटाके यांची विक्री सरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. आमदार राम कदम यांनी दिवाळीनिमित्त ११ हजार कुमारिकांच्या पूजनाचा उपक्रम हाती घेतला असून त्यांना भेटवस्तू देतानाच आई-वडिलांचा आदर करण्याचा संदेशही ते देतात.
बाळा नांदगावकर यांच्या शिवडी मतदारसंघात शिवडी, लालबाग, परळ, भोईवाडा, काळाचौकी, लोअर परेल आदी नऊ ठिकाणी साखर वाटप केंद्र दिवाळी निमित्त सुरू करण्यात येणार आहे.