१२ सिलेंडर सवलतीत देण्याची मागणी Print

प्रतिनिधी, ठाणे
सहाऐवजी १२ घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त दरात देऊन नागरिकांना दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बुधवारी ठाणे येथे सांगितले.
ठाणे महापालिकेतील भाजप पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी तावडे बुधवारी आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेच्या धर्तीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वाद मिटविण्यासाठी यशवंतराव चव्हाण तंटामुक्त मंत्रिमंडळ योजना राबवावी, असा टोलाही त्यांनी हाणला.