अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांचा राजीनाम्याचा इशारा Print

खास प्रतिनिधी, ठाणे
अंबरनाथ नगराध्यक्षपद निवडणुकीत आघाडीच्या पराभवास जबाबदार चार नगरसेवकांपैकी एक नासिर कुंजाली हा राष्ट्रवादीचा असून त्याच्या विरोधात येत्या दोन दिवसांत कारवाई न झाल्यास शहरातील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक राजीनामा देतील, असे आज शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी जाहीर केले.
२०१० मध्ये झालेल्या निवडणुकीतही पक्षाची एक नगरसेविका गैरहजर राहिली होती. त्यावेळी तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे आता गद्दारी करणाऱ्या नगरसेवकावर कारवाई न झाल्यास दिवाळीपूर्वीच पक्षाचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत.