भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण ठार Print

प्रतिनिधी , मुंबई
एका मोटरसायकलवरून तीन मित्र भरधाव वेगाने जात होते. प्रतितास सुमारे ९० कि.मी. वेगाने जात असताना अचानक ब्रेक लागल्याने दुचाकी उलटून झालेल्या अपघातात एक तरुण मरण पावला. ही घटना देवनार परिसरात संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. पार्थ जाधव (२०) असे या तरुणाचे नाव आहे.
दुचाकीवर फक्त दोघांनाच बसण्याची परवानगी असताना पार्थ जाधव, सिद्धेश कोणार, दीपक परमार असे तीन मित्र मोटरसायकलवरून भरधाव वेगाने फिरत होते. दुचाकी ९० किमी प्रतितास वेगाने धावत असताना अचानक ब्रेक लागले आणि दुचाकी उलटली. यामध्ये सर्वात मागे बसलेला पार्थ जाधव याचा मृत्यू ओढवला. सिद्धेश कोणार हा दुचाकी चालवित होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास सुरू आहे.