सेनाप्रमुखांच्या आरोग्यासाठी मनसेची प्रार्थना! Print

विशेष प्रतिनिधी, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तुळजापूर, पंढरपूर आणि अक्कलकोट येथे नुकतीच प्रार्थना केली. दसरा मेळाव्याच्यावेळी शिवसेनाप्रमुखांची प्रकृती खालावल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन वेळा मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी केली. बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, रिपाईचे नेते रामदास आठवले आदी नेतेही मातोश्रीवर गेले होते.